Breaking News

पनवेलमधून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, सीकेटी, आरटीसीसीएस महाविद्यालयांचा पुढकार

पनवेल : रामप्रहर वृत्त

अतिवृष्टी व दरड कोसळल्याने महाडवासियांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा अस्मानी संकटसमयी, पूरग्रस्त बांधवांना माणुसकीची हाक देत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय आणि रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (आरटीसीसीएस)चा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक अन्नधान्य किट, तसेच इतर मंगळवारी (दि. 27) महाड येथील पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.

सकाळी सीकेटी कॉलेज परिसरातून जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले वाहन महाडच्या दिशेने रवाना झाले. या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सीकेटी कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आरटीसीसीएसचे प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी यांनी उपस्थित होते.

संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या कार्याविषयीचे गौरवोद्गार काढले व सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. यासमवेत सीकेटी व आरटीसीसीएसच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सामाजिक कार्यात घेतलेल्या सक्रीय सहभागाचे कौतुक केले.

महाड येथील 650हून अधिक नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण यशस्वीरीत्या करण्यात आले. यात तांदूळ, मूगडाळ, तुरडाळ, गोडतेल, शेंगदाणे, साखर, चहापत्ती पुडा, बिस्किटे, औषधे, साबण, महिलांसाठी आवश्यक बाबी, कपडे इत्यादींचा समावेश होता. प्रस्तुत वितरण कार्यात सीकेटी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, प्रा. आकाश पाटील तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या काही निवडक स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेतला. जीवनावश्यक वस्तूंच्या संकलन कार्यात सीकेटी कॉलेजचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने आपापल्या परीने शक्य त्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत देऊ केली. प्राध्यापिका अपूर्वा ढगे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जगताप ह्यांच्या समवेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी अन्नधान्याचे किट्स बनविण्यात मदत केली.

हे मदतकार्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले. या उपक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समग्र कार्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply