Breaking News

‘व्हीडीआयपीएल’कडून महाड पूरग्रस्तांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पनवेल अर्थात व्हीडीआयपीएलच्या वतीने महाड पूरग्रस्तांना 700 चादर, 700 ब्लँकेट आणि 1400 टॉवेल आदी साहित्याची मदत पाठविण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 30) सकाळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीडीआयपीएलच्या वतीने पनवेल येथून महाडला मदत रवाना झाली. यावेळी उद्योजक अजय कांडपिळे, भाजपचे तालुका चिटणीस जयवंत देशमुख, रमेश देशमुख, व्हीडीआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक वैभव देशमुख, संचालक अमोल देशमुख, युवा नेते गौरव कांडपिळे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुराचे संकट आले. या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडने यापूर्वीही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले आहेत, तसेच पूरग्रस्तांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply