Breaking News

‘क्रांतिज्योत’तर्फे परिचारिकांचा सन्मान

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील नेहमीच महिलांसाठी कार्यरत असणारी एकमेव संस्था ती म्हणजे क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशन होय. महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारी ही संस्था आहे. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष रुपाली शिंदे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त फाऊंडेशनतर्फे परिचारिकांना सन्मानित केले.

कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक रुग्णाशी कसलाही दुजाभाव न करता शुश्रूषा करत आहेत. सध्या रुग्णांच्या सगळ्यात जवळची नातेवाईक ही परिचारिकाच असून, त्या ’सिस्टर’ या नात्याने पूर्ण सेवा देत आहेत. ह्या नारी शक्तींना त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ त्यांना सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम पनवेल मधील लोटस एमआरआय आणि सिटी स्कॅन सेंटर येथे डॉ. विकास डोळे यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला. या वेळी परिचारिका प्राची ठाकूर, रत्नमाला पाबरेकर, विशाका शिंदे, अनुराधा सूरी, वैष्णवी खंडागळे, संध्या बळे व इतर कर्मचारी, स्टाफ मेंबर यांना याठिकाणी सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे फाऊंडेशनच्या अध्यक्षा व सदस्या यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, तसेच सिडको समाज मंदिर भांटिया शाळा येथे नवीन पनवेल याठिकाणी डॉ. विजया लोहारे यांच्या सहकार्याने परिचारिका संजीवनी ठाकूर, प्रगती राणे, रेश्मा हेमाडे, नैना पाटील, रेणुका गव्हाणकर, ज्योत्स्ना पाटील, प्रियांका वारगे, नीता भांडे, साधना जाधव, विद्या मुंबरे, नीलिमा म्हात्रे, वैजयंती जुईकर, सपना भांबीड, नम्रता पाटील, नम्रता मुंडे, तेजश्री पंडित, नीता वानखेडे, रुपाली गावंडे, अर्चना अर्दरळकर, ज्योती गोवर्धने, दिव्या राणे आदी परिचारिकांना  फाऊंडेशनच्या अध्यक्षा रुपाली शिंदे यांच्या हस्ते जागतिक परिचारिका दिनाचे सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा या खास दिनी सन्मान करण्यात आला.

फाऊंडेशनच्या सदस्या यामिनी महाजन आणि रत्नमाला पाबरेकर यांनी अथक मेहनत घेतली. या वेळी सर्व परिचारिकांनी फाऊंडेशनचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply