Breaking News

एक हात मदतीचा… परिस्थिती सावरण्याचा!; महाडकरांना साहित्य वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

’एक हात मदतीचा… परिस्थिती सावरण्याचा’ या उद्देशातून पनवेल येथील वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (व्हीडीआयपीएल)च्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना 700 चादर, 700 ब्लँकेट आणि 1400 टॉवेल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीडीआयपीएलच्या वतीने शुक्रवारी पनवेल येथून महाड येथे मदत साहित्य रवाना झाले होते. या साहित्याचे वाटप आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना करण्यात आले. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, रमेश देशमुख, युवा नेते अमित घाग, सोपान जांभेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या मदतीबद्दल वाय. टी. देशमुख व कटुंबीयांचे महाडकरांनी आभार मानले.महाडमध्ये अतिवृष्टीमुळे पूर येऊन अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. घरातील सर्वकाही भिजून खराब झाले असल्याने कसे जगायचे, असा त्यांच्यापुढे प्रश्न असतानाच असंख्य हात मदतीसाठी सरसावले आहेत. सर्व स्तरांतून महाडच्या पूरग्रस्तांना मदत केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply