Breaking News

भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय साहित्याची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  पूर आला. या पूरग्रस्त भागामध्ये माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. त्यानुसार येथील झालेले नुकसान पाहता भविष्यात या ठिकाणी आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. त्याअनुषंगाने पनवेल भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्यविषयक उपयुक्त साहित्य जमा करण्यात आले.

पूरग्रस्तांना या संकटावर मात करण्यासाठी भाजपच्या वतीने अनेक नेते, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत. महाडमधील नागरिकांच्या घरात पूराचे पाणी शिरल्यामुळे घरातील कोणतीही वस्तू वापरता न येण्यासारखी झाली आहे. बँक, बाजारपेठा येथेही सर्व चिखल साचलेला असल्याने पैसे, वस्तू ते लोक आणू शकत नाहीत. खूप मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक साहित्यांची मदत होते आहे, मात्र काही दिवसांनंतर येथे साचलेल्या चिखलामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य समस्या उद्भ्वू शकतात.

याअनुषंगाने भाजपतर्फे डॉक्टरांचे पथक तेथे जाऊन आरोग्य सेवा देण्याचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स आणि आवश्यक आरोग्याचे साहित्य भाजपतर्फे जमा करण्यात आले. यासाठी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अतुल बहिरा, युवा नेते दशरथ म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply