Breaking News

अमली पदार्थांच्या विक्रीसह सेवन करणार्यांवर कारवाई करा

नागरिकांचे पोलीस ठाण्यात निवेदन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण शहर व परिसरातील अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात मुख्यते तरुण वयातील मुले-मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत. त्यावर आळा बसण्याच्या उद्देशाने उरण शहरातील जागरूक नागरिकांनी नुकतेच उरण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, उरण शहर व परिसरातील अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात मुख्यते तरुण वयातील मुले-मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत. याकडे गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी. जेणेकरून तरुण पिढी या प्रवाहात भरकटत जाणार नाही. निवेदन देतांना इमरान बुबेरे, अदनान खान, अदिब भाईजी, हनीफ बक्षी, मार्जान तुंगेकर, फहाद पटेल, सउद कुंवावाला, अ‍ॅड. नियाज पठाण आदी उपस्थित होते.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करू.

-प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply