Breaking News

भाजप-शिवसेनेत जोरदार इनकमिंग

नारळेवाडी कार्यकर्त्यांनी सोडली काँग्रेसची साथ

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीमधील नारळेवाडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सेनेचे जिल्हा सल्लागार भरत भगत यांनी पुढाकार घेऊन त्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. अवसरे येथे झालेल्या कार्यक्रमात नारळेवाडीमधील कमळू कांबडी, सतीश पुंजारा, मनोहर कांबडी, जयराम कांबडी, संतोष पुंजारा, गौतम पुंजारा, लक्ष्मण कांबडी, अशोक कांबडी, योगेश पुंजारा, तुकाराम पारधी, प्रकाश पुंजारा, लक्ष्मण पारधी, लक्ष्मण निर्गुडा, प्रकाश पुंजारा, बावका पुंजारा, दत्तू पुंजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन हाती बांधले. नाराळेवाडीमधील आदिवासी कार्यकर्त्यांनी उभी हयात काँग्रेसमध्ये घालविली, मात्र त्यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या मागे काँग्रेस पक्ष राहिला नाही म्हणून त्यांनी आपणहून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भरत भगत यांनी या वेळी सांगितले.  या वेळी भरत भगत यांच्यासह विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम कोळंबे, शिवसेनेचे तालुका उपसंघटक रमेश गवळी, पंचायत समिती गणाचे संघटक रवींद्र वेहेले, प्रवीण शिंगटे, मानिवली शाखाप्रमुख संतोष गवळी आदी प्रमुख उपस्थित होते.

खरोशीतील विविध पक्षांतील कार्यकर्ते ‘कमळा’कडे आकर्षित

पेण : प्रतिनिधी 

माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात पेण तालुक्यासह पूर्ण मतदारसंघात चालू असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांतील कार्यकर्ते भाजपत दाखल होत आहेत. भाजप ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष महेश पाटील यांच्या प्रयत्नाने खरोशी येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, श्रीकांत सर  उपस्थित होते. पेण तालुक्यातील खरोशी येथील सुरेश तुकाराम पाटील, संकेत नारायण म्हात्रे, दिनेश महादेव पाटील, प्रभाकर तुकाराम पाटील, कुणाल भास्कर पाटील, सागर लहू म्हात्रे, धर्मेश रामचंद्र पाटील, अक्षय नामदेव पाटील, आकाश अंबाजी पाटील, मोहन पांडुरंग पाटील, किरण सुरेश ठाकूर, सचिन सुरेश ठाकूर, विद्धेश गोविंद पाटील, अनिल बारक्या घरत या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. तरुणवर्गाची समर्थ साथ भारतीय जनता पक्षाला सदैव मिळत असून या सर्वांच्या पाठिंब्याने आपण पुन्हा एकदा या मतदारसंघात बाजी मारणार, असा विश्वास रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला. पूजा घरत, रामदास पाटील, महेश घरत, ए. पी. पाटील, प्रकाश घरत, जनार्दन पाटील, जगदिश पाटील, मितेश घरत, एच. एन. घरत, कल्पेश घरत, नरेश पाटील, मिलिंद रामचंद्र पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply