Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार

खारघर ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 21) आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व सहज योगा संस्था  खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. रणागमणार व सी. डी. आर. धारासिंग हे दोन्ही प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट लिखित स्वरूपात एमओयूमधून दोन्ही संस्थेच्या ज्ञान व संसाधनांमध्ये आवश्यक योगदान देण्याची हमी देऊन  करार हस्तांक्षरित करण्यात आला.

या एमओयुमधून महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना योगाचे धडे देण्याची हमी दिली. या कार्यक्रमांमध्ये प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड, प्रा.महेश्वरी झिरपे अंतर्गत गुणवत्ता सिद्धताकक्ष समन्वयक, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. महेश धायगुडे, प्रा. विशाल देशमुख, प्रा. योगिता पाटील, प्रा. सफिना मुकादम प्रा. डॉ. फारुख शेख प्रा. प्रथमेश उदेकर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांची प्रशंसा केली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले व पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply