Breaking News

पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? : अमित शहा

पुणे : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्ही जे केले त्याचा हिशोब आम्ही दिला. मग आता पवारांनी सांगावे की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल शहांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर, खासदार संजय काकडे आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल, बाबुराव पाचर्णे आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात शहा म्हणाले की, 50 वर्षे सत्तेत राहण्याची कला शरद पवार यांच्याकडे आहे. पक्ष कोणताही असो, परंतु ते सत्तेत होते. यांनी कुटुंबाचे राजकारण केले. त्यांना परिवाराशिवाय काहीही दिसत नाही. या महाराष्ट्रासाठी त्यांनी काय केले याची चर्चा करण्यास भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला सामोरे जावे, असे आव्हानही शहांनी पवारांना दिले. 

बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते, पण काहींना ही नुरा लढत वाटत होती, पण असे काहीही नाही. या लढतीत कोणतीही तडजोड नसून बारामतीत भाजपच येणार आहे. यातून महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल, असेही शहा म्हणाले.

शाह पुढे ते म्हणाले, पवार, राहुल गांधी, मायावती, उमर आणि फारुख अब्दुल्ला हे एकत्र बसले. कारण त्यांना भारत आणि काश्मीर यांचे वेगवेगळे पंतप्रधान करायची इच्छा आहे, परंतु आम्ही जिवंत असेपर्यंत काश्मीरला भारतापासून वेगळे होऊ देणार नाही. राहुल गांधी म्हणाले, गरिबी हटवू. मी त्यांना विचारतो की, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही तेच सांगितले. मग त्यांनी गरिबी का नाही हटवली? ज्यांनी गरिबी अनुभवली तेच हटवू शकतात. एक चहा विकणारी व्यक्ती आज जगात देशाचे नाव चमकवत आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply