Breaking News

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नवी मुंबईत दहा महिन्यांत 1282 घटना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईत चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून उकल होण्याचे प्रमाणही कमी आहे. विशेष म्हणजे या घटनांत सराईत चोरट्यांचा समावेश असल्याचे प्राथमिक संशय असून यात कोरोनाकाळात कारागृहातून सोडलेल्या आरोपींवर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या दहा महिन्यांत नवी मुंबईत चोरीच्याच फक्त एक हजार 282 घटना घडल्या आहेत. म्हणजे महिन्याला सरासरी 130 चोरीच्या घटना घडत आहेत. या चोरट्यांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी काळात नवी मुंबईत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसला होता, मात्र शिथिलीकरणानंतर हळूहळू चोरीच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर चोरट्यांनी रेखी सुरू केली असून दिवसा व रात्रीही शहरात चोरीच्या घटना घडत आहेत.

2020 मध्ये गेल्या वर्षी टाळेबंदी असताना 1100च्या आसपास चोरीच्या घटना घडल्या. त्यात निम्म्याहून अधिक रात्र घरफोडी झाल्या होत्या. जानेवारी ते ऑक्टोबर या पहिल्या दहा महिन्यांत 927 चोरीच्या घटना घडल्या होत्या. यात दोनशेपर्यंत दिवसा घरफोडीच्या घटना  घडल्या होत्या. यात 2012 मध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दहा महिन्यांत एक हजार 282 चोरीच्या घटना घडल्या आहेत. ज्यात तीनशेच्या घरात रात्रीच्या चोरीच्या घटना आहेत. त्यामुळे ही वाढ चिंताजनक आहे. शिवाय गुन्हे उकल प्रमाणही गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. गेल्या वर्षी 430 गुन्हे उकल झाले होते. यावर्षी पहिल्या दहा महिन्यांत 427 गुन्हे उकल करण्यात यश आले आहे.

सराईतांचा हात अधिक?

आतापर्यंत चोरीच्या उकल गुन्हात एक बाब समोर आली असून यात बहुतांश चोरटे हे कोरोनाकाळात कारागृहातून बाहेर आले असून ते पुन्हा चोरीच्या घटनांकडे वळले आहेत. त्यामुळे ते सराईत असल्याने पुरावे मागे ठेवत नसल्याने पोलिसांना तपास करणे आव्हान आहे.

चोरीच्या घटनांत होणारी वाढ चिंताजनक असली तरी नागरिकांच्या सहकार्याने ती रोखली जाऊ शकते. त्या अनुषधाने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात निश्चित आवश्यक आहे.पोलिसांना यश येईल. नागरिकांनीही सतर्क राहणे.

-सुरेश मेंगडे, उपायुक्त,गुन्हे शाखा

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply