Breaking News

महायुतीचे उमेदवार बारणे यांना मताधिक्य मिळवून देणार

पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला असून मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याच्या प्रचारासाठी दिघाटी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. अशा युतीच्या पदाधिकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या बळावर युतीचे उमेदवार यांना दिघाटी, केळवणे, साई, कासरभट, डोलघर, तारा, बांधनवाडी, कल्ले, बारापाडा परिसरातील सर्वाधिक मताधिक्य मिळून देणार, असा विश्वास दिघाटीचे सरपंच अमित पाटील यांनी व्यक्त केले आहे.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरण आणि पनवेल तालुक्यातील जनतेचा कल भाजपकडे वाढू लागला. त्या 2019ची लोकसभा निवडणूक ही भाजप मित्रपक्ष एकदिलाने लढवत असल्याचे या निवडणुकीत भाजप मित्रपक्षाला बहुमत मिळणार आहे, असेही अमित पाटील यांनी म्हटले आहे.

बारणे यांना विजयी करण्यासाठी केळवणे पंचायत समिती विभागात तर पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष संजय टेंबे, पनवेल पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे, शिरढोण मा. उपसरपंच मंगेश वाकडीकर, केळवणे पंचायत समिती अध्यक्ष हिरामण ठाकूर, केळवणे भाजपचे गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, साईचे सरपंच विद्याधर मोकल, ताराचे ज्येष्ठ नेते बालुशेठ पाटील, केळवणे उपसरपंच भानुदास गावंड, भाजपचे बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, इतर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत. या पदाधिकार्‍यांनी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी केळवणे पंचायत समिती पिंजून काढल्याने या पदाधिकार्‍यांच्या बळावर विजय निश्चित आहे. युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक

मताधिक्य मिळणार, असा विश्वास सरपंच अमित चांगाजी पाटील यांनी व्यक्त केले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply