Breaking News

महायुतीच्या जयजयकाराने उरण तालुका दणाणला

उरण : रामप्रहर वृत्त : 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीला उरण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शनिवारी संपूर्ण तालुक्यात शिवसेना, भाजप, रिपाइं मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भर उन्हात मतदारांशी संवाद साधत बारणे यांनाच पुन्हा विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मनोहर भोईर आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील गावोगावी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन शनिवारी

(दि. 20) करण्यात आले होते. या प्रचार रॅलीची सुरुवात 1984 सालच्या जासई लढ्यातील हुतात्म्यांना आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रचार रॅलीत उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, कामगार नेते दिनेश पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र घरत, समीर मढवी, ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, भाजपचे दीपक भोईर, माजी सभापती भास्कर मोकल, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, नीळकंठ घरत, मेघनाथ म्हात्रे, भाजपचे युवा नेते महेश कडू, प्रशांत पाटील, भाजपाचे तालुका चिटणीस सुनील पाटील, प्रदीप ठाकूर, तेजस पाटील, भाजप महिला अध्यक्षा संपदा थळी, शिवसेना महिला संघटक ज्योती म्हात्रे, माजी उपनगराध्यक्षा सुजाता गायकवाड, विभाग प्रमुख कमळाकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, माजी सरपंच विलास पाटील, प्रसाद पाटील, तालुका संघटक बी. एन. डाकी, गणेश म्हात्रे, उरण पंचायत समितीचे सदस्य  दीपक ठाकूर, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, माजी सरपंच जे. पी. म्हात्रे, नारायण ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र घरत, सरपंच बळीराम ठाकूर, तालुका उपाध्यक्ष जयवंत पाटील, शहरप्रमुख, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, तसेच गावोगावचे आजी-माजी सरपंच, सदस्य, युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रचार रॅलीत सहभागी झालेले युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना गावोगावच्या सुवासिनींनी ओवाळणी करून त्यांचे फटाक्यांच्या आणि ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

 या वेळी अरे आवाज कुणाचा, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते तल्लीन झाले होते. भाजप, शिवसेना, रिपाइंच्या ध्वजांनीही सारे वातावरण भगवे, निळे असे झाले होते. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते या वेळी उत्साही झाले होते.

भाजप एकदिलाने सहभागी

लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत एकदिलाने  सहभागी झाल्याचे दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मतदारसंघातील गावोगावी विकासाची गंगा आणण्याचे महान कार्य केले आहे. त्या विकासकामांच्या जोरावर महायुती मतदारांपुढे जात असून, विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय अटळ आहे.

-महेश बालदी, भाजप जिल्हा सरचिटणीस

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply