Breaking News

महायुतीच्या प्रचाराला ग्रामीण मतदारांचा प्रतिसाद

पळस्पे, कोळखे, कोन परिसरात मतदारांकडून उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पळस्पे, कोळखे व कोन येथे सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. या वेळी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक पुन्हा जिंकणार, असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे  पदाधिकारी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही मतदारांपुढे जात असून, खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठविण्याचा निर्धारही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. भर उन्हातही कार्यकर्ते मतदारांना घरोघरी भेटण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यांना मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply