Breaking News

भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन साजरा

उरण ः वार्ताहर

भारतीय मजदूर संघाचा 64वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. 23) जेएनपीटी टाऊनशिप येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कामगार नेते सुधीर घरत, जेएनपीटी विश्वस्त रवींद्र पाटील, जनार्दन बंडा, डी. एच. पाटील, बी. के. ठाकूर, मंगेश ठाकूर, जे. के. भोईर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघ म्हणजे देशाच्या ऐक्याचे प्रतीक असून संपूर्ण देशात सर्वप्रथम देशहित, उद्योगहित व नंतर कामगार हित  या विचारावर श्रद्धा असणारी बलाढ्य अशी नंबर एकची  कामगार संघटना आहे, असे या वेळी अध्यक्षीय भाषणात सुरेश पाटील यांनी आपले विचार मांडले.तळागळातील असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणारी, कामगाराला केंद्रबिंदू मानून देशहित जपणारी, उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील असणारी देशप्रेमी अशी संघटना म्हणजे भारतीय मजदूर संघ, असे कामगार नेते सुधीर घरत यांनी सांगितले. या वेळी कामगार विश्वस्त रवींद्र पाटील, जनार्दन बंडा यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी मोठ्या संख्येने कामगार तसेच महिला कामगारवर्गाची  उपस्थिती होती.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply