आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सरकारच्या जीवावर आमदार सुभेदार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान विधान परिषद आमदार आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष या दोघांनीही कर्नाळा बँकेबाबत नुकत्याच काढलेल्या निवेदनावरून कर्नाळा नागरी सहकारी बँक बुडाल्याचे आता शेकापनेच अधिकृतरीत्या जाहीरपणे मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘बँक व्यवस्थित आहे’ असा यापूर्वी आव आणणारे आणि कालांतराने बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर ‘आम्ही सगळे पैसे परत करू आणि मग फटाके वाजवू’ असे म्हणणार्या या आमदाराला आता शेकापची उरलीसुरली लाज वाचवण्यासाठी पुन्हा आपल्याच ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांना कामाला लावून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करावा लागत असल्याची चर्चा पनवेलकरांमध्ये आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँक अखेर अवसायनात काढल्याचे रिझर्व्ह बँकेचे विशेष संचालक जयंत कुमार दास यांनी घोषित केले. पाच लाखांपर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नव्या नियमानुसार आता परत मिळणार असताना त्याचे श्रेय घेण्यासाठी बँकेच्या ठेवीदार व खातेदार यांना शेकापतर्फे मेसेज पाठवून त्यांची माहिती मागवण्याचा प्रकार शेकापने केला आहे. आपल्याच पक्षाची चूक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न शेकापकडून सुरू असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.
मुळात कर्नाळा बँक बुडाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते, मात्र राज्य सरकार काहीच कारवाई करीत नसल्याने बँकेचे खातेदार आणि ठेवीदार हवालदिल झाले आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती स्थापन करून बँकेचे गैरव्यवहार उघडकीस आणले, तसेच माजी खासदार किरीट सोमय्यांची मदत घेऊन केंद्र सरकारकडून कारवाई करायला लावली आणि मग सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विवेक पाटील यांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले.
आता विवेक पाटील वाचत नाहीत हे शेकापच्या लक्षात आले. त्यामुळे बँकेसाठी असलेल्या सरकारी विमा तरतुदीचा फायदा उठवायचा आणि ‘आम्ही जनतेचे पैसे परत करीत आहोत,’ असे दाखवून ‘आपण किती धुतल्या तांदळासारखे आहोत,’ असे चित्र जनतेच्या नजरेत निर्माण करण्याचा प्रयत्न विधान परिषद आमदार करीत असल्याची चर्चा बँकेचे खातेदार आणि ठेवीदार करीत आहेत.
‘कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदार व खातेदार यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे विनंती करण्यात येते की, आपण कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखांपर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार आपणास परत मिळणार आहेत. तरी आपण आम्हास आपणाकडून खालील माहिती द्यावी,’ असे निवेदन प्रसिद्ध करणार्या या विधान परिषद आमदार आणि पनवेलच्या माजी नगराध्यक्षांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आपल्याच पक्षाचा तत्कालीन आमदार आणि नंतरचा माजी आमदार विवेक पाटील बँकेत लोकांचे पैसे बुडवण्याचे उद्योग करीत होता तेव्हा तुम्ही त्यांना का रोखले नाही, असा सवालही जनता करीत आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच ‘डीआयसीजीसी’ कायद्यामध्ये मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या सुधारणेद्वारे आता बँक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर पाच लाखांचे विमा कवच मिळणार आहे. त्यानुसार एखाद्या बँकेला रिझर्व्ह बँकेने ‘मोरॅटोरिअम’मध्ये टाकल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील एकूण रकमेपैकी पाच लाख रुपये मिळतील असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. पूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती, परंतु केंद्र सरकारने ती वाढवून पाच लाख इतकी केली आहे, तसेच 90 दिवसांच्या आत म्हणजे केवळ तीन महिन्यांमध्ये बँकेच्या ठेवीदाराला ही सुविधा मिळेल. कर्नाळा बँकेच्या 48 हजार ठेवीदारांना याचा फायदा होणार आहे. त्यांच्या ठेवीचे पैसे परत मिळतील. याव्यतिरिक्त उर्वरित दोन हजार 458 ठेवीदारांचे 270 कोटी 72 लाख रुपयांच्या ठेवींना मात्र विम्याचे संरक्षण नसल्याने त्यांना याचा फायदा मिळणार नाही.
केंद्राच्या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रकार
रिझर्व्ह बँकेने आता कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना ‘बँकिंग बिझनेस इन इंडिया अंडर रेग्युरेशन 22 सेक्शन 56, रेग्युरेशन अॅक्ट 1949’नुसार रद्द करीत असल्याची अधिसूचना जारी केल्यामुळे कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखापर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नव्या नियमानुसार ठेवीदारांना परत मिळणार आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी शेकापच्या नेत्यांनी ठेवीदारांना तुमच्या ठेवी परत देत आहोत. त्यासाठी तुमची माहिती भरून द्या, असा मेसेज पाठवला आहे. बँकेत भ्रष्टाचार करून आता आम्हीच तुमचे पैसे परत देत आहोत हे सांगणे म्हणजे, ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असा आव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न शेकाप नेत्यांचा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हा बघा विवेक पाटलांचा उर्मटपणा!
कर्नाळा बँक बुडत आहे असे वाटल्याने सुरुवातीच्या काळात आपले साठवलेले पैसे मागण्यासाठी काही खातेदार आणि ठेवीदार हे बँक प्रशासन आणि अगदी अध्यक्ष विवेक पाटील यांच्याकडेही गेले होते. त्यापैकी काहींना औषधोपचारासाठी, तर काहींना घरातील लग्नकार्य वा इतर समारंभासाठी, काहींना घर बांधण्यासाठी अशा विविध कामांसाठी स्वतःचे हक्काचे पैसे हवे होते. त्यांच्याशीही तत्कालीन अध्यक्ष विवेक पाटील कसे उर्मटपणे बोलत होते त्याची चित्रफित सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून पाहा.
किरीट सोमय्या आज पनवेलमध्ये
कर्नाळा बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांच्या खांद्याला खांदा लावून अखेरपर्यंत लढत असलेले माजी खासदार किरीट सोमय्या शनिवारी (दि. 21) पनवेलमध्ये होणार्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ठेवीदारांचे विमा संरक्षण एक लाखाहून पाच लाखांपर्यंत वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच कर्नाळाच्या ठेवीदारांना आता पाच लाखांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे.
शेकापला ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणजे त्यांनी आता जनतेला केलेले आवाहन ‘राम प्रहर’च्या वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत :
सर्व कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदार व खातेदार यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे विनंती करण्यात येते की, आपण कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखापर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार आपणास परत मिळणार आहेत. तरी आपण आम्हास आपणाकडून खालील माहिती द्यावी
नाव ः——————
खातेनंबर ः——————
मोबाइल नंबर ः——————
पत्ता ः——————
आपले नम्र ,
आमदार श्री. बाळाराम पाटील
मा. नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे
सदर माहिती पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
- गणेश कडू 9967250007, 2. राजेश केणी 8425845800, 3. प्रकाश म्हात्रे 9820975055, 4. गोपाळ भगत 9867168085, 5. रवींद्र भगत 8652111001, 6. ज्ञानेश्वर पाटील 9819495983, 7. विजय काळे 9819888182, 8. पुरुषोत्तम भोईर 9323261982, 9. जगदिश पवार 7741025505, 10. नंदकिशोर भोईर 9930750916, 11. अनिल ढवळे 9322280455, 12. देवेंद्र मढवी 7021983161, 13. रवींद्र पाटील 9821117988, 14. देवेंद्र पाटील 9604994675, 15. एस. के. नाईक 9221041018, 16. रमाकांत म्हात्रे 9821530280, 17. दशरथ गायकर 9623888808, 18. जितेंद्र म्हात्रे 9619100466, 19. शंकर म्हात्रे 9223415426, 20. डॉ. आरिफ दाखवे 9422495310, 21. ज्ञानेश्वर मोरे 9869369250, 22. ज्ञानेश्वर घरत 9221507394, 23. राजू पाटील 9822558296, 24. अशोक मोरे 9869042353, 25. अशोक गिरमकर 9619767999, 26. संतोष तांबोळी 9892481782, 27. संतोष गायकर 8080053999, 28. अजित अडसूळ 9820027116, 29. बबन विश्वकर्मा 8767522220, 30. अमोल शितोळे. 9870370082, 31. मंगेश अपराज 9324668800, 32. रोहन गावंड 9326050505, 33. प्रल्हाद केणी 9220850794, 34. अनिल केणी 9323190304, 35. अमित भोईर 8080049800, 36. सुनील पाटील 9702027696, 37. रवी घरत 9819574072, 38. रमाकांत विष्णू पाटील 9324457855, 39. रमाकांत पाटील 9076469892, 40. मेघनाथ तांडेल 9930303930, 41. नरेश घरत 9324422229, 42. रवींद्र विश्वनाथ पाटील 9322888905, 43. किरण कडू 8422022444, 44. सुरेश पाटील 8655029073, 45. हेमंत पाटील 9870576111, 46. सचिन घरत 9664444044, 47. रूपेश मोहिते 9082419879, 48. राजेंद्र घरत 9323039596, 49. नंदू मुकादम 9970166261, 50. चंद्रकांत भोईर 9930770313, 51. सुशांत पाटील 8898043242, 52. विकास रायकर 9503220283, 53. राजीव पाटील 8308198756, 54. राम भोईर 9820104713, 55. अशोक गायकर 9970061919, 56. रामेश्वर आंग्रे 9892696910, 57. सुनील मोकल 9221057231.