Breaking News

बीसीटी विधी महाविद्यालयात फूड फेस्ट उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लेक्चर सिरीज, रोझ डे, मिस-मॅच डे, ट्रॅडीशनल डे, मराठी भाषा दिवस, सारी डे आणि फूड फेस्ट 2020 अशा विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शिक्षणेतर कार्यक्रमांची रेलचेल होती. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यातील स्पर्धात्मक फूड फेस्टमध्ये लज्जतदार पदार्थांची मेजवानी होती. फूड फेस्टच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. शितला गावंड यांनी अतिथींचे स्वागत केले. फूड फेस्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन व्हाईट चिकन, कोळंबी भाकरी, मटण भाकरी, चिकन ग्रेव्ही, तसेच भाकरी, मिसळ पाव, कॉर्न लॉलीपॉप, पुरणपोळी, मोदक, पाणीपुरी, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, चॉकलेट यासारखे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ अत्यंत माफक दरात सादर केले. या स्पर्धेत पदार्थांचे सादरीकरण, स्वच्छता आणि चव अशा बाबींसाठी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. मुख्य अतिथी वर्षा ठाकूर आणि अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी सर्व बाबी पडताळून गुणांकन केले आणि सर्वाधिक गुण मिळविणार्‍या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांना प्रशस्तीपत्रके वितरित केली. दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी विधी महाविद्यालय विविध कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी हरतर्‍हेने प्रोत्साहन देत असल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. स्पर्धेत मांसाहारी पदार्थांमध्ये गुलाब खुटले हिने प्रथम, तर निदा टोले हिने व्दितीय, तर शाकाहारी पदार्थांत प्रतीक्षा ठाकूरने प्रथम आणि पूर्णिमा पाटेकरने द्वितीय पारितोषिक पटकाविले. खाद्यपदार्थांची मेजवानी असल्याने विद्यार्थ्यांनी या फुड फेस्टचा मनमुराद आनंद लुटला.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply