Breaking News

‘आरसीबी’ने केले मोठे बदल; तीन नवे खेळाडू संघात होणार दाखल

बंगळुरू ः वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने भारतीय संघाविरोधात श्रीलंकेला टी-20 मालिकेत विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. आरसीबीने भारतीय संघाविरोधात चांगला खेळ करणार्‍या खेळाडूंना निवडण्याची परंपरा कायम राखली. हसारंगा हा टी-20 रँकिंगमध्ये दुसर्‍या स्थानावर आहे. हसारंगाला झाम्पाच्या जागी स्थान मिळाले आहे. यासोबतच दुष्मंता चमिरालाही निवडण्यात आले आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅम्सची जागा घेईल. बिग बॅशमध्ये शानदार खेळ करणार्‍या टीम डेव्हिडला न्यूझीलंडच्या फिन एलेनच्या स्थानी संघात घेण्यात आले आहे. फ्रेंचायझीने याची माहिती दिली की, त्यांचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीच हे वैयक्तिक कारणांमुळे पदावरून दूर झाले आहे. त्यामुळे आता क्रिकेट संचालक माइक हेसन हे संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. भारतीय खेळाडू, सहयोगी स्टाफ आणि संघ व्यवस्थापन 21 ऑगस्ट रोजी बंगळुरूत एकत्र येणार आहे. त्यानंतर सर्व जण सात दिवस विलगीकरणात राहतील. या दरम्यान तीन दिवसांनी त्यांची कोविड तपासणी केली जाणार आहे. संघ त्यानंतर विशेष विमानाने बंगळुरूला रवाना होईल. अन्य आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्टाफ 29 ऑगस्टला संयुक्त अरब अमिरातीत एकत्र येणार आहे. तेथे सहा दिवसांचे विलगीकरण असेल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply