Breaking News

कोरोनाचा ढोलकी विक्रीवर परिणाम

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोनाच्या सावटाखाली साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवात यातील ढोलकीचा आवाज दाबला गेला आहे. आज रस्त्यावर ढोलकी विकण्यासाठी फिरणार्‍या विक्रेत्यांच्या ढोलकीचा आवाज कुणाच्या कानी पोहचत नाही.

गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी गावोगावी, शहरातील गल्लीबोळात खांद्यावर पाच, सहा ढोलक्या घेऊन, त्यातील एक ढोलकी वाजवत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ढोलकीविक्रेते दरवर्षी फिरतात. कोरोनाने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम केला आहे.

कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कुठे दुःखाची सावली, तर कुठे आर्थिक संकट यातून संसारचे सूर जुळवावे लागत आहेत. कोरोना आणि टाळेबंदी यामुळे सर्वांचा आर्थिक कणा मोडला आहे, त्याला हे ढोलकी विक्रते तरी कसे अपवाद असणार.

आपल्या ढोलकीचा आवाज ऐकून कोणी तरी ये ढोलकीवाला, म्हणून हाक मारेल आणि ढोलकी विकत घेईल या आशेवर हे ढोलकीवाले फिरत आहेत, पण अनेकांच्या पदरी निराशा येत आहे. सध्या कुणी ढोलकी विकत घेत नाही.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply