Breaking News

दिवाळनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

अश्विनी पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गट व महिला मंडळांनी दिवाळनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन  भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वर्षा प्रशांत ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली. याचबरोबर पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, सुशीला घरत, नगरसेविका चारूशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, संतोषी तुपे, हर्षदा उपाध्याय, रूचिता लोंढे, महिला मोर्चा सदस्य संध्या शारबिंद्रे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या वेळी अश्विनी पाटील यांनी, कोरोना काळात संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती डगमगली होती, त्या वेळी महिलांनी सक्षमपणे घराचा कारभार सांभाळण्याचे काम केले असल्याचे मत व्यक्त केले.
पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यानुसार महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात या द़ृष्टीने पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात महिला बचत गट व महिला मंडळांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply