नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ)ने कॅनडा ओपन व यूएस ओपन सुपर 300 टुर्नामेंट रद्द केल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीडब्ल्यूएफने हा निर्णय घेतला आहे.
यूएस ओपनचे आयोजन या वर्षी 6 ते 11 जुलै या कालावधीत होणार होते, तर कॅनडा ओपन 29 जून ते 4 जुलै या कालावधीत होणार होती, मात्र कोरोनामुळे या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे.
बीडब्ल्यूएफने याबाबत सांगितले की, कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध पाहता आयोजकांना स्पर्धा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नव्हता. या निर्णयास यूएस बॅडमिंटन आणि कॅनडा बॅडमिंटन संघांनीही सहमती दर्शविली.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …