Breaking News

रायगडात ‘लालपरी’च्या उत्पन्नात वाढ

राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागात 40 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे  या विभागातील आठ आगारांतून एसटीच्या दिवसाला सरासरी 450 फेर्‍या होत आहेत. प्रवाशांचा प्रतिसादही  मिळत आहे. त्यामुळे मागील महिन्यात रायगड विभागात  एसटीचे दिवसाला सात लाख रुपये असणारे उत्पन्न या महिन्यापासून दिवसाला तब्बल 10 लाखांवर गेले आहे. लालपरी ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जीवन वाहिनी आहे. एसटीवर गावगाड़ा चालतो, सर्व व्यवहार एसटी बस वाहतुकीवर अवलंबून असतात. मागील तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यातील काही कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. त्यामुळे रायगड विभागातदेखील परिवहन महामंडळाच्या गाड्या काही प्रमाणात धावतांना दिसत आहेत. गाड्यांच्या फेर्‍या हळूहळू वाढत असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने खूप सोयीचे होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील भरून जात आहेत. अनेक लोक स्थानिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व फेसबुकवर गाड्यांचे वेळापत्रक आवर्जून शेअर करत आहेत. परिणामी प्रवाशांची वेळ व पैसेदेखील वाचत आहेत, असे एका प्रवाशाने सांगितले.

एसटीची रायगड विभागातील आगारे : राज्य परिवहन महामंडळाची रायगड विभागात कर्जत, पेण, अलिबाग, मुरूड, रोहा, माणगाव, महाड व श्रीवर्धन अशी एकूण आठ आगारे आहेत.

कर्मचार्‍यांची स्थिती : संपापूर्वी या आठही आगारांत सुमारे 2252 कर्मचारी होते. ज्यामध्ये वाहक, चालक तसेच प्रशासन, लेखा व यांत्रिक विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यातील सुमारे 850 ते 900 कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यात 250 वाहन चालक व वाहक आहेत.

गाड्या व फेर्‍या : आठ आगारांत सर्वसाधारणपणे 450 गाड्या आहेत. त्यातील 350 गाड्या संपाआधी वापरल्या जात होत्या. सध्या यातील 100 गाड्या वापरल्या जात आहेत. आणि आठ आगारातून रोज 450 फेर्‍या होत आहेत.

अजूनही काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. जे शेवटचे आवाहन केले, तेव्हा जवळपास 100 कर्मचारी हजर झाले आहेत. उपलब्ध संसाधने व कर्मचार्‍यांद्वारे परिवहन सेवा सुरू आहे. प्रवाशांचा प्रतिसादही खूप चांगला.

-अनघा बारटक्के, रायगड विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply