उरण : प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण येेथील गाडे हॉस्पिटलसाठी विजेवर चालणारे ऑक्सिजन निर्मितीचे स्वयंचलीत मशीन प्रदान करण्यात आले आहे.
उरणात दैनंदिन होत असणारी कोरोना रुग्णांची वाढ, त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी संजीवनी ठरलेल्या ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेता खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणार्या अन्य रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासू लागत आहे. यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने गाडे हॉस्पिटलला ऑक्सिजनचे मशीन देण्यात आले आहे. या वेळी डिस्ट्रीक चेअर पर्सन सदानंद गायकवाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाश नाईक, डॉ. संतोष गाडे, झोन चेअरपर्सन डॉ. प्रीती गाडे, प्रमिला गाडे, अनंता गायकवाड यांच्यासह लायन्सक्लबचे अन्य सदस्य उपस्थित होते.