Tuesday , February 7 2023

खारघरमध्ये घरकाम करणार्या महिला, सुरक्षा रक्षकांसाठी विशेष लसीकरण

नगरसेविका नेत्रा पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत समाजातील वंचित, गरीब व गरजू घटक असलेल्या घरकाम करणार्‍या महिला तसेच सुरक्षा रक्षक यांना मोफत लसीकरण करण्याची मागणी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत महिला व सुरक्षा रक्षक यांच्यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने खारघरमध्ये करण्यात आले होते.

पनवेल महापालिकेच्या नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेच्या पहिला टप्प्यात एकूण 200 घरकाम करणार्‍या महिला व सुरक्षा रक्षकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

या वेळी भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, उपाध्यक्ष दिलीप जाधव, पनवेल महापालिकेच्या डॉ. वर्तिका कोटनाला, डॉ. रोमा म्हसकर, भरत कोंढाळकर, संदीप एकबोटे, कुणाल देवकर, अनिकेत कातोरे, दिनेश यादव आदी उपस्थित होते.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply