Breaking News

भाजप महिला मोर्चातर्फे कोविड योद्ध्यांना रक्षाबंधन

तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाऊ बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. कोरोना महामारीच्या काळात अपला जीव धोक्यात घालून आपले रक्षण करणारे पोलीस, सफाई कामगार, अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक यांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधण सण साजरा झाला. महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 26) हा उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका व शहरतर्फे तालुका पोलीस स्टेशन, शहर क्राईम ब्रान्च, ग्रामीण रुग्णालय, कळंबोली आरटीओ ऑफिस, सफाई कामगार, अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा साप्ताहीक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, तालुका उपाध्यक्ष समिना साठी, चिटणीस शिल्पा म्हात्रे, शहर उपाध्यक्ष सुहासिनी केकाने, शहर उपाध्यक्ष, निता माळी, कोशाध्यक्ष अदिती मराठे, सचिव स्नेहल खरे, अंजली इनामदार, वैद्यकीय सेल अध्यक्ष ज्योती देशमाने, मयुरी उन्नटकड, नीता मंजुळे, मानसी मोरे, जागृती कदम आदी उपस्थित होत्या.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply