Breaking News

कोरोना परिस्थितीबाबत नवी मुंबई पालिका आयुक्तांशी चर्चा

नवी मुंबई : प्रतिनिधी

भाजप आमदार रमेश पाटील यांनी नवी मुंबईतील कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी शहरांमध्ये दिवसंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेमार्फत कोरोनाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत. याविषयी चर्चा केली.

यामध्ये आमदार पाटील यांनी अधिक कोविड सेंटर कुठे उभारली आहेत. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोणती पावले उचलली याची माहिती आयुक्तांकडून घेतली, तसेच रेंमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा असल्याने काळ्या बाजारामध्ये  कोविड रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणले.

कोरोच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी आयुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना बाधित रुग्णासाठी एक वेब पोर्टेल सुरू केले आहे. 24 तास डॉक्टरांची टीम तयार करून हेल्प लाईन मार्फत रुग्णांना सर्व माहिती दिली जात आहे. शहरांमध्ये सिडको एक्जीबिशन सेंटर वाशी, राधा स्वामी सत्संग हॉल, एमजीएम हॉस्पिटल कोविड सेंटर उभारण्यात आले आहे, तसेच नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले. जे हॉस्पिटल महानगरपालिकेला सहकार्य करत नाही, अशा हॉस्पिटल ला पालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. खाजगी हॉस्पिटल रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करत असल्याने ते रोखण्यासाठी 20 मे 2020  रोजीच्या परिपत्रकानुसार सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असल्याचेही बांगर यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान युवा नेते विशाल पाटील, अ‍ॅड. चेतन पाटील, राज जयस्वाल आदी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply