Breaking News

गव्हाणच्या उपसरपंचपदी विजय घरत बिनविरोध; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विजय घरत यांची सोमवारी (दि. 31) बिनविरोध निवड झाली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घरत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजप युतीचे विजय घरत यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या आवारात आनंदोत्सव साजरा केला. या निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक एम. डी. पाटील यांनी पहिले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उद्योजक जे. एम. म्हात्रे, रघुनाथशेठ घरत, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, सदस्य सचिन घरत, तसेच हेमंत पाटील, पी. के. ठाकूर, रोशन म्हात्रे, अरुण कोळी, श्रीधर भगत, अनंताशेठ ठाकूर, भाऊ ठाकूर, सुधीर ठाकूर, साईचरण म्हात्रे, निर्गुण कवळे, व्ही. के. ठाकूर, वसंतशेठ पाटील, चिंतामण घरत, दयानंद घरत, माजी सरपंच जिज्ञासा कोळी, सुहास भगत, सुनील पाटील, आशिष घरत, भगवान घरत, अण्णा घरत, सुहास ठाकूर, चंदन ठाकूर, निर्मला म्हात्रे, नर्मदा घरत, मनीषा ठाकूर, अनुसया घरत, जयश्री घरत, नंदा भोईर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, शिल्पा कडू, सुनीता घरत, उषा देशमुख, गिरीजा कातकरी आदी उपस्थित होते. दरम्यान, उपसरपंच विजय घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी वामनशेठ म्हात्रे, अजय भगत, अमृत भगत, भाऊ भोईर, सुधीर ठाकूर, काशिनाथ पाटील, सुनील पाटील, सी. एच. घरत, गजानन घरत, कमलाकर घरत, आशिष घरत, संदीप म्हात्रे, मधुकर पाटील, चिंतामण घरत, गणेश पाटील हेही उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply