Breaking News

गुड न्यूज! पनवेलमध्ये 100हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!!

पनवेल : बातमीदार

पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी त्यासोबतच या महामारीतून बरे होणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे. तालुक्यातील 142 रुग्ण रविवार (दि. 17)अखेर ठणठणीत बरे झाले आहेत.

पनवेल तालुक्यात कामोठे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर खारघर, कळंबोली, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल व पनवेलमध्ये संसर्ग पसरला. ग्रामीण भागातही रुग्ण आढळलेत.

कोरोना रुग्णांवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणि कामोठे येथील खासगी एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खारघर येथील ग्रामविकास भवन आणि कोन येथील इंडिया बुल्स येथेदेखील संशयित रुग्ण ठेवले जातात. कळंबोली स्वास्थ रुग्णालय कोविड हेल्थ सेंटर घोषित करण्यात आले आहे, मात्र सध्या तिथे एकही रुग्ण ठेवण्यात आला नाही.

कोरोनाचे रुग्ण वाढून काहींचा मृत्यू झाला असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरीही परतत आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील 115 व ग्रामीण भागातील 27 रुग्ण बरे झाले आहेत, तर जिल्ह्यातील एकूण 161 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply