Breaking News

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी, शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी गोरगरिबांपर्यंत पोहचवणारे त्यांना शिक्षणाचे द्वार उघडून देणारे भगिरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 62वी पुण्यतिथी करण्यात आली.

कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस, कामगार नेते, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, नरेश घरत, यशवंत घरत, धर्मदाय घरत, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, गुरुकुल प्रमुख जी.आर. म्हात्रे, लेखनिक सुरेश ठाकूर, राजेश कांबळे व पांडुरंग मुंबईकर आदी उपस्थित होते. या वेळी सर्वांनी कर्मवीर अण्णांना अभिवादन केले.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply