कर्जत : बातमीदार
श्री साई ट्रस्ट आणि कर्जत नगरपालिकेच्या समाजकल्याण सभापती वैशाली दीपक मोरे यांच्या माध्यमातून गुंडगे गाव आणि पंचशीलनगर येथील सुमारे 50 पूरग्रस्त कुटुंबांना ब्लँकेट, चादर आणि बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
बुद्धविहार येथे झालेल्या या मदत वाटप कार्यक्रमाला नगरसेविका वैशाली मोरे, श्री साई ट्रस्टच्या चेअरमन लक्ष्मी अय्यर, गणेश अय्यर, माजी नगरसेवक दीपक मोरे, शिल्पकार मंडळाचे अध्यक्ष सौरभ सरावते, शरीरसौष्ठवपटू राहील शेख, पंचशील नगर मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव, मनीष मोरे, भूषण मोरे, आनंद गायकवाड, दिलीप घुले, राहुल गायकवाड, शरद मोरे इत्यादी उपस्थित होते. या वेळी श्री साई ट्रस्टकडून 50 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.