Breaking News

नवी मुंबईत ‘ओल्ड एज होम’चे बांधकाम प्रगतिपथावर

आमदार मंदा म्हात्रे यांनी केली पाहणी

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर 38 येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारण्यात येणार्‍या ओल्ड एज होमच्या बांधकामाची बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी (दि. 8) पाहणी दौरा केला.

या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, मंडळ अध्यक्ष जयवंत तांडेल, उपाध्यक्ष पुण्यनाथ तांडेल, कार्यकारी अभियंता अजय संखे, उपअभियंता कल्याण कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता अनुजा सासवडकर, वात्सल्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, मच्छिंद्र तांडेल, अमित मढवी तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 

नवी मुंबई सीवूड्स से-38 भूखंड क्र. 13 येथे उभारण्यात येणार्‍या ओल्ड एज होम वास्तूच्या बांधकामाकरिता सुमारे साडे चार कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून आमदार निधीतूनही 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मे. डेल्टाटेक कंस्ट्रक्शन प्रा. लि. कंपन मार्फत हे बांधकाम सुरू असून सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण करून ज्येष्ठासाठी खुले करण्यात येणार आहे. 

ओल्ड एज होम ज्येष्ठ नागरिक भवनच्या या वास्तूमध्ये स्टील पार्किंग, कार्यालय, किचन कम डायनिंग हॉल, टोयलेट ब्लोक, स्टेयर केस, लिफ्ट, स्टेज, योगा रूम, स्टोर रूम, मेडिकल रूम तसेच वृद्धांना राहण्याकरिता खोल्या बांधण्यात येणार आहेत.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिला व नवी मुंबई महानगरपालिकेने ते उभारले. याच अनुषंगाने महापालिका अधिकारी व अभियंता यांनी पाहणी दौरा केला असून हे बांधकाम प्रगतीपथावर असल्याने लवकरच या वास्तूचे बांधकाम पूर्णत्वास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply