नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात सोमवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत 28,591 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,32,36,921वर पोहचली. याचवेळी, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती 3,84,921 इतकी झाली. याच काळात 338 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे, कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा 4,42,655 वर पोहचला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या 6595ने कमी होऊन ती 3,84,921 इतकी झाली. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 1.16 टक्के आहे. आतापर्यंत 3,24,09,345 लोक बरे झाले असून, हे प्रमाण 97.51 टक्के इतके आहे. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींच्या मात्रांची संख्या 73.82 कोटींपलीकडे गेली आहे. गेल्या 24 तासांत मृत्युमुखी पडलेल्या 338 जणांपैकी 181 केरळमधील, तर 35 महाराष्ट्रातील आहेत.