आरीन फाउंडेशन व अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेचा उपक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
आरीन फाउंडेशन आणि अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था दिवा महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आर्थिक दृष्टया गरीब, गरजू,दीन, दुबळे, अपंग, विधवा, निराधार यांच्या उत्कर्षा साठी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमाचा एक रविवार शिव मंदिर, कांदा बटाटा मार्केट, सेक्टर 18, तुर्भे – वाशी,नवी मुंबई येथे आर्थिक दृष्ट्या गरीब, अनाथ, अपंग,विकलांग,गरजू माथाडी कामगारांचे मुलांसाठी शैक्षनिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम झाला.
या वेळी 100 गरीब आणि गरजू माथाडी कामगारांच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थांना शैक्षनिक किट ज्यामध्ये स्कूल बॅग, सहा वह्या, नोट बुक, सहा पेन, तीन शिस्पेंसिल, खोडरबर, कंपोस पेटी इत्यादी उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमात आरीन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष नितेश मिसाळ, प्रकल्प अधिकारी किरण जाधव, अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था दिवा संस्थापकअध्यक्ष सुरेश दुधाने, संस्थेचे हितचिंतक दिगंबर मोरडे, सुधीर बिरादार, पांडुरंग पाटील यांनी उपस्थित राहून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.