Breaking News

गणपती विसर्जनस्थळी स्वच्छता मोहीम

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त पनवेलमध्येही विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार भाजप खारघर मंडलच्या वतीने गणपती विसर्जन तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

खारघर सेक्टर 15 येथे सोमवारी (दि. 20) येथील गणपती विसर्जन तलावाजवळील परिसरात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अभियानांतर्गत भारतीय जनता पक्ष, दक्षिण भारतीय सेल खारघर मंडलच्या वतीने गणपती विसर्जन घाटाजवळ कचरा स्वच्छ करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा देताना खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक निलेश बाविस्कर, दक्षिण भारतीय सेल संयोजक रोहन शेट्टी, सह-संयोजक रामकृष्णन, पर्यावरण कार्यक्रम प्रमुख योगिंद्रम कोट्टारी, मनोहर नक्का, प्रभाकर चिदुराला, एन सेंथिल मुरुगन, पेरुमाला, चेल्लाप्पा दास व रहिवासी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी सदैव गरीब, वंचित, दलित, आदिवासी, मागास आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. अनेक दशकांनंतर समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज मोदी सरकारकडून ऐकला जात असून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार सज्ज आहे. नरेंद्र मोदी गुजराजचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून 7 ऑक्टोबर 2021 ला जनतेच्या आशीर्वादाने जनसेवक म्हणून 20 वर्ष पूर्ण करत आहेत. 7 ऑक्टोबर 2001 ला गुजरातचे मुख्यमंत्री व 2014 रोजी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान झाले. लोकशाहीत लोकनेता ही संधी फार कमी नेत्यांना मिळत असून पंतप्रधान मोदी यांची निरंतर वाढणारी लोकप्रियता हे दर्शवत आहे. या वर्षी पंतप्रधान मोदी यांचा जनसेवक म्हणून 20 वर्षे कार्यकाळ पूर्ण झाल्याचा सुखद योगायोग व आनंदी क्षण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सेवा व समर्पण अभियानांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply