Breaking News

पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

कोशिश फाउंडेशनच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित बाप्पा मोरया घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 18) येथे करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंडेशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक 14, 18, 19 व 20 मर्यादित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25 हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या वेळी कोशिश फाउंडेशनचे सदस्य चिन्मय समेळ, अयुब अकुला आदी उपस्थित होते.

दिड दिवसाच्या गणपती सजावटीचे विजेते
प्रथम – अश्विनी खेडेकर आणि नेहा डोंगरे
द्वितीय – अक्षया चितळे
तृतीय – जगदिश गायकर

पाच दिवसांच्या गणपती सजावटीचे विजेते
प्रथम – संदीप मारुती शेळके
द्वितीय – विक्रांत रानडे
तृतीय – अंजली महाजनी

दहा दिवसांच्या गणपती सजावटीचे विजेते
प्रथम – साहित्या देशमाने

गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा यापूर्वी प्रभाग 19पर्यंत मर्यादित होती, पण अनेक नागरिकांच्या आलेल्या सूचनेनुसार या स्पर्धेचा विस्तार करण्यात आला. स्पर्धेला दरवर्षी उत्तरोत्तर उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार.
-परेश ठाकूर, अध्यक्ष, कोशिश फाउंडेशन व सभागृह नेते, पनवेल महापालिका

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply