Breaking News

आमदार महेश बालदी यांचे प्रयत्नाने मोरा येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र

उरण : वार्ताहर

कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. खाजगी हॉस्पिटल लसीकरणासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. गरीब-गरजू नागरिकांना लसीकरण मोफत मिळावे या उद्देशाने आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून उरण तालुक्यातील मोरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 20) या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, हितेश शाह, माजी नगरसेविका नंदा माजगावकर, माजी नगरसेवक राजेश कोळी, विनायक कोळी, रोहित कोळी, अप्पू कोळी आदी उपस्थित होते.

या केंद्रावर कोरोना लसीकरण दर सोमवार व गुरुवार सकाळी 9 वाजल्यापासून देण्यात येईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply