Breaking News

शेकाप कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’

खारघर : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत आहे. अशाच प्रकारे खारघर येथील शेकापचे रघुनाथशेठ ठाकूर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी

(दि. 22) भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

खारघर येथील भाजप कार्यालय आणि आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘अ’ अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नीलेश बाविस्कर, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील, भाजपचे प्रभाकर जोशी, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, मधुमिता जेना, नवनीत मारू, अमित घोरपडे, विनोद ठाकूर, सनी नवघरे, नरेश पांचाळ, जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम, विलास राठोड, सचिन वास्कर, काशिनाथ घरत, सुरेश ठाकूर, कृष्णा खडकी, साधना पवार, प्रतीक्षा कदम, आशा शेडगे, मोहन म्हात्रे, श्रीकांत पाटील, गुरुनाथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी शेकापचे नेते रघुनाथशेठ ठाकूर, विष्णू ठाकूर, किशोर ठाकूर, सुनील ठाकूर, दत्ता कोळी, शिवनाथ गुप्ता, सुहास पाटील, रियाज मुकादम, सारिका गांधी, प्रीतम गांधी, सिराज शहा, रूपेश कोळी, महेंद्र कोळी, कासीम खान, मंदार कवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वागत करून आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन सर्वांना केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply