
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या आरती संदीप भोईर यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्या झालेल्या झालेल्या सभेमध्ये रवींद्र भोईर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या सभेला गीता देशमुख, मंजुळा डांगरे, दत्ता वाघमारे, कल्पना गायकवाड, महेंद्र भोईर, शोभा पवार, अर्चना वांजळे, रवींद्र भोईर आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच रवींद्र भोईर यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संतोष भोईर, नारायण भोईर, उद्योजक भगवान भोईर, शिवसेना तालुका संघटक राजेश जाधव, उपतालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, विभाग प्रमुख नारायण पायगुडे, श्रीराम भालिवडे, मावळत्या सरपंच रतन वाघमारे, माजी उपसरपंच दीपक देशमुख, मनीषा दळवी, अरुण सावंत, प्रवीण देशमुख, नंदकुमार देशमुख, समीर भोईर, जयंत भोईर, विद्या देशमुख आदींसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
माजी सरपंच संतोष भोईर यांनी घालून दिलेल्या शिरस्त्याप्रमाणे शिरसे ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करून ग्रामपंचायतला आघाडीवर नेणार असल्याची ग्वाही थेट सरपंच आरती संदीप भोईर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper