Monday , February 6 2023

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

रसायनी ः प्रतिनिधी

अलिबागमधील खिडकी येथे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, स्व. व्ही. जी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुल्या गटात साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी 30 सप्टेंबर अगोदर प्रवेश फी 50 रुपये  गुगल पेद्वारे भरून दर्शन पाटील (9923952732) किंवा श्रेयस पाटील (9420728564) यांच्याकडे करावी तसेच नाव, ठिकाण, जन्मतारीख, मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप नंबर, व्हॉट्सअ‍ॅप किंवा एसएमएसने विलास म्हात्रे, अलिबाग (8888011411), गोपीनाथ डंगर, अलिबाग (9850015440), चंद्रशेखर पाटील, पनवेल (9326504179), संदीप पाटील, उरण (9920351983), किशोर देशपांडे, गोरेगाव (8888250234), अंकित जोशी, कर्जत (8087440936) यांच्याकडे द्यावेत. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र, यशस्वी स्पर्धकांना रोख रकमेचे बक्षीस, तर पहिल्या पाच स्पर्धकांना चषक देण्यात येणार आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply