Breaking News

वर्ल्डकप फायनलसाठी बीसीसीआयची तयारी; 25 हजार चाहते राहणार उपस्थित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आयपीएल सामन्यादरम्यान चाहते स्टेडियममध्ये येऊ लागले आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि अमिरात क्रिकेट मंडळ (ईसीबी) 25 हजार चाहत्यांना वर्ल्डकप फायनलसाठी बोलावण्याची तयारी करीत आहे, मात्र यासाठी त्यांना यूएईच्या अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागेल. वर्ल्डकप स्पर्धा ही आधी भारतात होणार होती, पण कोरोनामुळे ती यूएईमध्ये हलवण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या या स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत. बीसीसीआय स्पर्धेचा आयोजक आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तथापि, सध्या यूएईमध्ये केवळ 10 टक्के चाहत्यांना परवानगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि ईसीबीला फायनलसाठी मोठ्या संख्येने चाहत्यांना आमंत्रित करायचे आहे. जर सर्व प्रोटोकॉल लक्षात ठेवून परवानगी दिली गेली तर ती चांगली ठरेल, मात्र परवानगीबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामनेही ओमानमध्ये होणार आहेत.’ आयपीएलदरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना पीसीआर चाचणी करण्याची गरज नाही. त्यांना फक्त कोरोना लसीकरणाच्या दोन्ही डोसचे पुरावे द्यावे लागतील. दुसरीकडे, शारजाहचे नियम वेगळे आहेत. येथे केवळ 16 वर्षांवरील प्रेक्षकांना प्रवेश मिळेल. याशिवाय लसीकरण प्रमाणपत्र आणि पीसीआर चाचणीचा निकालदेखील सोबत आणावा लागेल. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चाहत्यांना लसीकरणाचा पुरावा द्यावा लागेल. यासह पीसीआर चाचणीचा निकालदेखील सोबत घ्यावा लागेल. जर कोणी एकदा स्टेडियमच्या बाहेर गेला असेल, तर त्याला परत येऊ दिले जाणार नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply