Breaking News

पनवेलमध्ये जनजागृती बाईक रॅली

पनवेल : वार्ताहर

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायलय, मुंबई यांचेकडील सुचनांप्रमाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांचेकडील पत्रान्वये 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात पॅन इंडिया अर्व्हेनेसचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. त्या निमित्ताने तालुका विधी सेवा समिती पनवेल व पनवेल बार असोसिएशनतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा न्यायालय पनवेल येथे विधी सेवा प्राधिकरणाबाबत जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन केले आले होते.

पनवेलमधील जिल्हा न्यायालय येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रतिमचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. बाईक रॅली जिल्हा न्यायालयापासून सुरू होऊन सावरकर चौक ते गावदेवी मंदीर रोडने, कापड बाजार रोडने जुने तहसील-महानगरपालिका कॉम्प्लेक्स रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचरत्न हॉटेल, या चौकवरून टपालनाकापासून मोहल्ला रोडने महानगरपालिका पालिका कार्यालय येथून पनवेल उपजिल्हा रुग्णालयपर्यंत व तेथून पनवेल तालुका पोलीस स्टेशन रोडने जिल्हा न्यायालय येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या जनजागृती बाईक रॅलीमध्ये जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) राव, भाकरे, मुजावर तसेच सर्व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), पनवेल बार संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील व कार्यकारिणी वकील वर्ग उपस्थित होते.

तसेच अ‍ॅमिटी लॉ स्कूल पनवेल, केएलई लॉ कॉलेज कळंबोली, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज तळोजा, विल्फेड लॉ कॉलेज पनवेल येथील विद्यार्थी, पंचायत समिती पनवेल, तहसील कार्यालय पनवेल यांनीदेखील या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला असून ईन्फीनिटी फाउंडेशन आणि ऑकर इंडीया स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते तसेच ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते संतोष ठाकूर हेदेखील उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply