पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 3) करण्यात येणार असून त्यानिमित्त दुपारी 12.30 वाजता मोहोपाडा येथील साई मंदिर सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यकर्ता मेळाव्यास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तत्पूर्वी, आमदार महेश बालदी यांच्या निधीतून व व जिल्हा नियोजन अंतर्गत गुळसुंदे जि. प. विभागातील गुळसुंदे येथील शिवमंदिर सुशोभीकरण (25 लाख रुपये), आकुलवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (13 लाख रुपये), वावेघर येथे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिकटीकरण (15 लाख रुपये), वावेघर येथे अंगणवाडी बांधणे (8.5 लाख रुपये) सावळे येथे अंगणवाडी बांधणे (8.5 लाख); सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यातून केळवणे जि. प. विभागातील राज्यमार्ग क्र. 107 गुळसुंदे ते राज्यमार्ग क्र. 104 कराडे खुर्द, जांभिवली, सवणे येथील रस्त्याची दुरुस्ती (एक कोटी 43 लाख 95 हजार), आमदार निधीतून कराडे खुर्द गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण (12 लाख रुपये); वासांबे जि. प. विभागातील आळी आंबिवली येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण (15 लाख रुपये), आळी आंबिवली येथे अंतर्गत आरसीसी गटार बांधणे (15 लाख रुपये), मोहोपाडा पोसरी येथील तलाव सुशोभीकरण करणे (30 लाख रुपये), वासांबे जि. प. विभागात मोहोपाडा, चांभार्ली, वरोसे, नढाळ येथे हायमास्ट दिवे बसविणे (प्रत्येकी 2.99 लाख रुपये) या विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper