Breaking News

राष्ट्रवादीच्या आर्यन ठाकूर यांचा भाजप प्रणित संघटनेत जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल उरण शहरात राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर्यन ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्ष प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी स्वागत केले आहे.

मुंबई येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य पद्मा पांडे, अफसर शेख, विनोद विश्वकर्मा, अक्षय सिंग, संदीप सिंग, शहजाद शेख, राजू कनोजिया, दीपक शर्मा, कमलेश राजभर, रुद्र प्रताप सिंग, प्रशांत तिवारी, नीरज सलवल, सलमान शेख, अनुप गुप्ता, राजेश यादव, महेंद्र रेड्डी, सुमंत कुमार झा, रमाशंकर दुबे यांनी भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

या सर्व प्रवेशकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी सदीच्छा व्यक्त केल्या. या वेळी नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निर्गुण कवळे, अश्विनी अगमकर, दत्ता केंद्रे, विकी पाटील, इस्माईल मुल्ला, गोपाळ व्यवहारे, आदेश कुमार सिंग यांच्यासह वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply