Sunday , September 24 2023

रोह्यात पावसाला जोरदार सुरुवात

रोहे ः प्रतिनिधी
गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत असतानाच अखेर सोमवारी (दि. 12) सायंकाळी रोह्यात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे, परंतु सोसाट्याचा वारा सुटला असल्याने गेले तीन दिवस विजेचा लंपाडाव सुरू होता. बिपरजॉय वादळामुळे यावर्षी पाऊस कोकणात उशिराने दाखल झाला. असे असजे तरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. रोह्यात प्रचंड उष्णता वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. अखेर सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मंगळवारी सकाळीही पाऊस पडला. चक्रीवादळाच्या परिणामामुळे गेल्या तीन दिवसांपासून सोसाट्याचा वारा सुटला होता. यामुळे नेहमीप्रमाणे वीजेचा लपंडाव सुरू होता. हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे. दुसरीकडे नागरिकांनी छत्री, रेनकोट बाहेर काढल्याचे दिसून आले.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply