Breaking News

सुधागडातील भेरव येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण

पाली : प्रतिनिधी

टाटा ब्ल्यू स्कोप व रोटरी क्लब अमनोरा पुणे यांच्या सहकार्याने भेरव (ता. सुधागड) येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे शुक्रवारी (दि. 1) लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब, टाटा ब्ल्यू स्कोप यांचे जनहिताचे काम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी या वेेळी केले.

भेरव येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी वाफेघर अंगणवाडी व आदिवासीवाडी समाजमंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे, भविष्यात रायगड जिल्ह्यातील विविध गावांत शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा आमचा मानस असल्याचे रोटरी क्लब अमनोराचे अध्यक्ष प्रमोद डोकनिया यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते संजय सागळे यांचेही या वेळी समयोचित भाषण झाले.

गटविकास अधिकारी विजय यादव, रोटरी क्लबचे सचिव सरस्वती व्यंकटेश, नयना रोकडे, रंजना म्हात्रे, शिक्षा मिश्रा, रुचिता बेलोसे, वसंत मांजरेकर, संजय सागळे, अर्जुन सागळे, संजना सागळे, गणेश सागळे, महेश सागळे, सुधीर सागळे, जयदास सागळे, निखिल सागळे, अमर सागळे, गणेश कदम, मंगेश  वाघमारे, लीला सागळे, देवयानी सागळे, रेश्मा सागळे, दर्शना सागळे, नंदा शिंदे, अंजना मेमाने, जयश्री सागळे, भारती सागळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply