Breaking News

रविशेठ पाटील यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील मुसळधार पावसाचा फटका खाडी किनारील गावांना बसला असून वाशी विभागातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या वेळी भर पावसातही माजी मंत्री रवि शेठ पाटील यांनी वाशी, कणे, बोर्झे, लाखोला, ओढांगी, येथील  पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी 100 टक्के नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रात, तहसीलदार यांना सांगितले. या वेळी पेण नगरपालिका गटनेते अनिरुध्द पाटील, भाजप प्रवक्ते मिलिंद पाटील, श्रीकांत सर, ग्रा.पं.  सदस्य रविकांत म्हात्रे, सरपंच गोरख पाटील, कुणाल पाटील उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply