Breaking News

येलावडे येथील गोहत्या घटनेचा निषेध

माणगाव पोलीस ठाण्यात दिले निवेदन

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील येलावडे गावाच्या परिसरात गुरुवारी (दि. 30) रात्री अज्ञात व्यक्तींनी दोन गाभण गोमाता आणि एका गोवंशाची कत्तल केली. हिंदू समाज बांधवानी शनिवारी (दि. 2) माणगाव प्रशासकीय भवनाच्या पटांगणात जमून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच गोहत्या करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

माणगाव व तळा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून गोहत्येच्या घटना वारंवार घडत आहेत, मात्र गोहत्या करणार्‍यांचा शोध पोलिसांना लागत नाही. अशा आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अन्यथा तमाम हिंदू समाज बांधव एकवटून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही हिंदू समजाच्या वतीने देण्यात आला. येलावडे येथील गोहत्या प्रकरणी मंगेश सीताराम शिंदे (वय 47, रा. येलावडे) यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार श्री. भोजकर अधिक तपास करीत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply