शेतकर्यांना मोफत सातबाराचे वाटप
सुधागड : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शेतकर्यांना मोफत घरपोच सातबारा वाटपाचा शुभारंभ महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपासून करण्यात आला. सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे आमदार रवीशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, गटविकास अधिकारी विजय यादव, नायब तहसीलदार, सरपंच, मंडळ अधिकारी नांदगाव, तलाठी, कोतवाल यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना संगणकीकृत व डिजिटल सातबारा उतार्याचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर नगर येथे सुधागड पंचायत समिती सभापती रमेश सुतार, सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार, नवघर ग्रामपंचायत सरपंच, सुधागड पंचायत समिती गट विकास अधिकारी विजय यादव, नायब महसूल तहसीलदार, सरपंच, मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना डिजिटल सातबारा उतार्याचे वाटप करण्यात आले.
सुधागड तालुक्यातील 33 महसुली गावांमध्ये 1930 सातबाराचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार रवीशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, पंचायत समिती सभापती रमेश सुतार, सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, महसूल नायब तहसीलदार वैशाली काकडे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, अतोणे सरपंच रोहन दगडे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.