इंटरनेटचा वापर आणि त्या माध्यमातून होणारी सध्याविक्री वाढत चालली असून तिचा लाभ आपल्या उत्पादनांना व्हावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यातीलच एक म्हणजे ओम्नी चॅनेल. त्याचा वापर करून मोठी होत असलेली ब्युटी व कंझ्युमर केअर प्रॉडक्ट्स कंपनी ‘नायका’ भागविक्रीसाठी सज्ज झाली आहे.
दसरा आणि दिवाळीसारखे सण म्हटलं की, एकूणच घराघरांत उत्साहाचं वातावरण असतं. दसर्याच्या निमित्तानं सोनं खरेदी व इतर मुहूर्ताची खरेदी होऊन हे सत्र दिवाळीपर्यंत चालू राहतं. शेअर बाजारदेखील या गोष्टींचं भान ठेऊन असतो. आपसूकच सणासुदीच्या दिवसांत वाढणारी खरेदीही व्यापार्यांसाठी, पुरवठा साखळीसाठी, उत्पादकांसाठी, कच्चा माल पुरवठादारांसाठी आणि अर्थसहाय्यकांसाठी अनेक सकारात्मक गोष्टी आणत असते. त्याचप्रमाणं शेअर बाजारामध्येदेखील येत्या एक-दोन महिन्यांत अनेक कंपन्या आपली प्राथमिक समभाग विक्री करण्यास चढाओढ लावून आहेत. त्यामधील प्रमुख आणि सर्वांच्याच परिचयाच्या दोन कंपन्या म्हणजे नायका आणि पेटीम. त्यातील नायकाबद्दल या वेळी चर्चा करू.
अगदी परवाच भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील देशाच्या सिक्युरिटीज आणि कमॉडिटी मार्केटसाठी असलेल्या नियामक संस्थेनं (सेबी) प्राथमिक समभाग विक्रीसाठी नायका कंपनीस सुधारित डीआरएचपी दाखल करण्यासाठी परवानगी दिली. म्हणजे ड्राफ्ट (मसुदा) रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस, ज्याला ऑफर डॉक्युमेंट असंही म्हटलं जातं. बुक बिल्डिंगद्वारे आपल्या शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री करू पाहणार्या कंपन्यांसाठी त्यांचे मर्चंट बँकर्स प्राथमिक नोंदणी दस्तऐवज तयार करतात.
तर, ओम्नी-चॅनेल सौंदर्य आणि ग्राहक-काळजी उत्पादनांचा (ब्युटी व कंझ्युमर केअर प्रॉडक्ट्स) किरकोळ विक्रेता असणारी कंपनी नायका (छूज्ञरर) अंदाजे 4000 कोटी रुपयांचा प्राथमिक इश्यू आणण्याच्या विचारात आहे. ज्यामध्ये ऑफर फॉर सेल (जऋड)देखील समाविष्ट असेल ज्याद्वारे विद्यमान भागधारक जसे की, कंपनीचे प्रवर्तक संजय नायर फॅमिली ट्रस्ट 48 लाख तर इतर कंपनीतील मोठे गुंतवणूकदार टीपीजी, लाईट हाऊस इंडिया फंड, जेएम फायनॅन्शिअल्स, योगेश एजन्सीज आणि इतर वैयक्तिक गुंतवणूकदार मिळून एकूण 431.1 लाख शेअर्स विकतील. प्राथमिक समभाग विक्री पश्चात संस्थापक फाल्गुनी नायर आणि तिचं कुटुंब हे प्रमुख भागधारक राहतील. ज्यांचा कंपनीमधील हिस्सा 53 टक्के पेक्षा जास्त आहे.
ओम्नी चॅनेल म्हणजे नक्की काय?
या कंपनीकडं वळण्याआधी आपण समजून घेऊ की, ओम्नी चॅनेल म्हणजे नक्की काय? आज आपण प्रत्येक जण या ना त्या कारणानं इंटरनेटशी जोडले गेलेलो आहोत. अनेक वेबसाईट ब्राउझ करण्याशिवाय आपण युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी गोष्टी अव्याहतपणे हाताळत असतो. आता कोणत्याही व्यवसायाचा प्रमुख उद्देश असतो विक्री आणि आपल्या ग्राहकांना सांभाळणं आणि नवनवीन ग्राहक जोडणं. आज वर उदाहरण दिलेले सोशल मीडिया केवळ मीडिया न राहून डिजिटल मार्केटर्ससाठी चॅनेल्स बनलेले आहेत आणि अशाप्रकारे प्रत्येक शक्य असलेल्या प्लँटफॉर्मवर हजर (प्रेझेन्स) राहणं व आपल्या कंपनीची अथवा आपल्या उत्पादनांची जाहिरात करणं यालाच म्हणतात ओम्नी चॅनल प्रेझेन्स आणि मार्केटिंग, जे आजच्या युगात खूपच मस्ट आहे. समजा तुमच्या कंपनीच्या उत्पादनाची जाहिरात केवळ फेसबुक व इंस्टावरच येत असेल आणि तुमच्या स्पर्धकाच्या तत्सम उत्पादनांची जाहिरात मात्र प्रत्येक सोशल मीडिया चॅनेलवर झळकत असेल (पॉप अप) तर साहजिकच एक उत्सुकता म्हणून त्या जाहिराती उघडल्या जाऊ शकतात आणि तुमच्या ग्राहकास दुसरा पर्याय प्राप्त होतो. सुरुवातीस कोणताही ग्राहक तुमच्या वेबसाईटला एकदा भेट देतो व तो त्याच्या मागणीनुसार उत्पादनं तपासतो आता त्यानंतर तुमच्या प्रणालीचं अथवा व्यवस्थेचं काम आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता (ईींळषळलळरश्र खपींशश्रश्रळसशपलश) प्लॅटफॉर्म वापरून त्या ग्राहकाचा रस कोणकोणत्या गोष्टींमध्ये आहे ते समजून त्यास विविध चॅनेल्सवरून तत्सम जाहिराती दाखवत राहणं आणि त्यास स्वतःच्या कंपनीस जोडून ठेवणं (ीश-ारीज्ञशींळपस). तर अशी ही ओम्नी चॅनल्सद्वारे लोकांसमोर आपली प्रसाधनांची व पर्सनल केअर उत्पादनांची मालिका सादर करणारी नायका ही भारतीय कंपनी.
76 ऑफलाइन स्टोअर
ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी असून फाल्गुनी नायर, ज्या आधी कोटक महिंद्र कॅपिटलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कार्यरत होत्या त्यांनी ह्या कंपनीची 2012 मध्ये स्थापना केली. कंपनी ओम्नी चॅनेल्सखेरीज आपल्या 76 ऑफलाइन स्टोअरमध्ये सौंदर्य, निरोगीपणा आणि फॅशन संबंधित उत्पादनांची विक्री करते. 2015 मध्ये कंपनीनं केवळ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून ओम्नी चॅनेल मॉडेलमध्ये विस्तार केला आणि सौंदर्य उत्पादनांव्यतिरिक्त इतर विक्री करण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये कंपनीनं पुरुषांच्या ग्रूमिंगसाठी भारतातील पहिलं मल्टी-ब्रँड ईकॉमर्स स्टोअर ’छूज्ञरर ारप’ लॉन्च केले. कंपनीनं छूज्ञरर ऊशीळसप र्डीींवळे सुरू करून फॅशनच्या दालनामध्ये विस्तार केलाम नंतर ज्याचं नाव बदलून छूज्ञरर ऋरीहळेप केलं गेलं. 2020 मध्ये कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर 2000 पेक्षा जास्त ब्रॅण्ड्स आणि दोन लाखांपेक्षा जास्त उत्पादनं विक्रीस उपलब्ध आहेत. कंपनीचे छूज्ञररर्ङीुश, छूज्ञरर जप ढीशपव आणि छूज्ञरर लशर्रीीूं घळेीज्ञी असे तीन ऑफलाइन स्टोअर फॉरमॅट आहेत. लक्स फॉरमॅटमध्ये हुडा ब्यूटी, एमएसी, डायर आणि गिवेंचीसारख्या आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्यूटी ब्रॅण्ड्स आहेत, ज्यामध्ये नायका ब्यूटी, सौंदर्य उत्पादनांचादेखील संग्रह आहे. छूज्ञरर जप ढीशपव फॉरमॅटमध्ये श्रेणीनुसार निवडलेली लोकप्रिय उत्पादनंच आहेत. भारतात, छूज्ञरर एकमेव किरकोळ विक्रेता आहे जे श.श्र.ष, उहरीश्रेीींंश ढळश्रर्लीीू, ढेपूोश्रू, इशललर, डळसार, ङळाशलीळाश, ऊशीारश्रेसळलर, रपव र्चीीरव यासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडची विक्री करते. याव्यतिरिक्त नायकामध्ये सौंदर्य आणि फॅशन अंतर्गत स्वतःच्या (खप-र्हेीीश) ब्रँडचीदेखील मालिका आहे. त्यापैकी छूज्ञरर छर्रीीींरश्री, छूज्ञरर उेीाशींळली, घरू इशर्रीीूं तर छूज्ञरर फॅशन अंतर्गत, छूज्ञव लू छूज्ञरर, 20 ऊीशीीशी, ठडतझ, चेपवरपे, ङळज्ञहरव झळरि इशश्रश्र यांचादेखील समावेश होतो. नायका नॅचरल्स पोर्टफोलिओ हा स्किनकेअर आणि पर्सनल केअर उत्पादनांचा संग्रह आहे. 2019च्या सुरुवातीस, ब्रँडनं आपले वंडरलस्ट बाथ आणि बॉडी कलेक्शन लाँच केले आणि नंतरच्या वर्षात नायकाद्वारा आयकॉनिक डिझायनर मसाबा गुप्ता हिच्या नांवासह ब्यूटी लाइन सादर केली.
तोट्यातून फायद्यात आलेली कंपनी
नायका ही भारतातील अनेक रिटेलर्समधील एक अशी कंपनी आहे जी नफ्यामध्ये आहे. आर्थिक वर्ष 20 मधील 16.34 कोटी रुपयांच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत वित्त वर्ष 21 मध्ये 61.96 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला गेलेला आहे. आर्थिक वर्ष 21 मध्ये कंपनीची त्याची कमाई 38 टक्के वाढून 2453 कोटी झाली आहे जी 2020 मध्ये 1700 कोटी रुपयांच्या आसपास होती तर 2019 मध्ये हीच आकडेवारी केवळ 1100 कोटी रुपयांच्या आसपास होती. गेल्या दोन वर्षांमध्ये कंपनी ही तोट्यात असल्यानं एकूण समभाग विक्रीपैकी 75 टक्के भाग हा क्वालिफाईड इंस्टिट्युशनल बायर्स (टखइ) साठी राखून ठेवण्यात येईल तर केवळ 10 टक्के भाग हा किरकोळ गुंतवणूकदारारांसाठी (दोन लाखांपर्यंत) असेल. नक्कीच नायका त्यांच्या ग्राहकांव्यतिरिक्त गुंतवणूकदारांच्यादेखील पसंतीस उतरणार यात शंकाच नाही.
सुपरशेअर : टाटा टेक्नॉलॉजीज
मागील आठवड्यात टाटा ग्रुपच्या ’पांचो उंगलीयां घी में’ अशी परिस्थिती होती. एअर इंडियासाठीची बोली जिंकल्यानंतर टाटा समूहाच्या सर्वच कंपन्यांनी जोरदार तेजी नोंदवली. टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर व टाटा पॉवर हे शेअर्स आघाडीवर होते. टीपीजी राईज क्लायमेट फंडनं टाटा मोटर्सच्या नव्या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करार केला आणि त्याचा परिणाम टाटा मोटर्स व इतर इलेक्ट्रिक व्हेईकल संबंधित टाटाच्या कंपन्यांवर झाला (टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा स्टील, इत्यादी). याव्यतिरिक्त टाटा समूहाची आणि टाटा मोटर्सची उपकंपनी असलेली टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअरनादेखील अनलिस्टेड मार्केट मध्ये जोरदार मागणी दिसली. गेल्या दोन महिन्यांत या शेअरची किंमत 2300 रुपयांवरून वाढून 4800 रुपये झालेली आढळून येतेय. या कंपनीचा 74 टक्के हिस्सा हा टाटा मोटर्सकडं असून येत्या दोन ते तीन वर्षांत कंपनी जोरदार वाढ दर्शवण्याच्या तयारीत आहे. ‘या क्षणी आमच्या जवळजवळ सर्व उत्पादन विकास उपक्रमांमध्ये काही प्रकारचे विद्युतीकरण आहे. आम्ही करत असलेले बरेचसे काम खरोखरच इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर तयार करण्याविषयी आहे जे प्रवासी आणि ड्रायव्हरच्या अनुभवाच्या प्रकाराला समर्थन देते आणि आमचे बरेच ग्राहक त्यासंबंधानं रणनीती आणि योजना तयार करत आहेत. ’टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचे सीईओ वॉरेन हॅरिस यांनी असं म्हटलंय. यावरून या कंपनीस महत्त्व प्राप्त होताना दिसतंय आणि ही कंपनी नक्कीच येत्या काही वर्षांत टाटा मोटर्सच्या यशाचा हिस्सा असेल यात वाद नाही. अशा अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर्स कायदेशीररित्या विकत घेता येऊ शकतात.
-प्रसाद भावे, अर्थप्रहर