कर्जत : बातमीदार
तालुक्यातील मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने प्लास्टिकबंदीचे स्वागत केले असून, ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व पाच गावे आणि एका आदिवासी वाडीमध्ये जाऊन ग्रामपंचायत आणि शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. गोळा झालेल्या सहा बॅग प्लास्टिक पिशव्या एका खड्ड्यात गाडण्यात आल्या.
मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने माझं गाव सुंदर गाव, प्लास्टिकबंदी आणि गाव स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे. सरपंच प्रवीण पाटील यांनी सर्व सदस्यांसह मानिवली, वरई, अवसरे, निकोप, मोहोली येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेत रस्त्यावरील व रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले प्लास्टिक गोळा केले. सरपंच प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य संकेत पाटील, जयश्री गवळी, दीपा डायरे, पोलीस पाटील रामचंद्र गवळी, सदस्य मधुकर गवळी, संजय डायरे आदी उपस्थित होते.