ग्रामपंचायत पोटनिवडणूक नऊ ठिकाणी अर्ज मागे

पनवेल : बातमीदार

तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी 10 नामनिर्देशित अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी नऊ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर आपटा ग्रामपंचायतीसाठी केवळ एक अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे.पनवेल तालुक्यात कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, गव्हाण, वडघर, तरघर, उलवे या ग्रामपंचायतींसाठी 8 डिसेंबरला मतदान होत असून, मतमोजणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये गव्हाण येथे चार जागांसाठी, उलवेत दोन जागांवर, तर कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, वडघर, तरघरसाठी प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार होते, पण कुंडेवहाळ, वाकडी, चिखले, गव्हण, वडघर, तरघर, उलवे या सात ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवार उभा राहिलेला नसल्याने तेथे निवडणूक होणार नाही, तर आपटा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झालेली आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply